Wednesday, May 7, 2014

" Chivada "


" Chivada "
By Chef Prashant Adsule.
साहित्य-
भाजके पोहे पाव किलो,
पाव किलो दाणे,
100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून,
100 ग्रॅम डाळ,
10 ते 12 मिरच्या,
पाव किलो तेल,
मीठ,
लाल तिखट,
धन्या-जिर्‍याची पूड,
1 चहाचा चमचा पिठीसाखर,
मूठभर कडूलिंबाची पाने,
फोडणीचे साहित्य.
कृती-
1] भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या.
2] मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या.
3] त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता.
4] हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला.
5] दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता.
6] नंतर भाजके पोहे घाला.
7] नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता.
8] गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

" चकली "


" चकली "
By Chef Prashant Adsule.
साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून तेल
चवीपुरते मिठ
कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

*Kanda Bhajji / Crispy Onion Pakoda (4 Portions – ~12 pakodas)* *Ingredients List with Costing* Sr. No. Ingredient Quantity Unit Price (₹/Kg...